Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket

Release Date:

The world of tennis-ball cricket is unearthed and beyond imagination. In the last few years, it has blossomed. The fan base of tennis-ball cricket is growing exponentially courtesy of live-streaming platforms. Players have made a decent career playing tennis-ball cricket as the sport became commercially viable. Krishna Satpute  @KrishnaSatputeOfficial  is the superstar of this ‘tennis-ball’ world. The fans fondly call him the ‘God of Tennis-Ball Cricket’. On the sidelines of the Indian Street Premier League (ISPL), Krishna opens up about the difference between a tennis ball & leather ball cricket, the importance of such tournaments and a lot more in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale… 
टेनिस-बॉल क्रिकेटची व्याप्ती आणि पसारा वाटतं त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. प्रत्येक लहान-मोठ्या खेळाडूने आयुष्यात कधी ना कधी टेनिस-बॉलने क्रिकेट खेळलं आहे आणि अनेक खेळाडू टेनिस-बॉल क्रिकेटपासून सुरुवात करुन भारतासाठी पण खेळले आहेत. भारतभर टेनिस-बॉलच्या स्पर्धा होतात आणि त्याचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. गेल्या काही वर्षांत टेनिस-बॉल क्रिकेटला व्यवसायिक स्वरूप आलं आहे. काही खेळाडू टेनिस क्रिकेटवर घर चालवू शकतात इतके मोठे झाले आहे आणि कृष्णा सातपुते हा टेनिस-बॉल क्रिकेटचा इतका मोठा सुपरस्टार आहे कि लोकांनी त्याला सचिन तेंडुलकरसारखी 'गॉड ऑफ टेनिस-बॉल क्रिकेट' अशी पदवी दिली आहे. इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या (ISPL) निमित्ताने कृष्णाने स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारल्या. टेनिस आणि लेदर बॉल क्रिकेट मधला फरक, टेनिस क्रिकेटमधला सुपला शॉट आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या  स्पर्धा होण्याचं महत्त्व या सगळ्याबद्दल अमोल गोखलेने कृष्णाला बोलतं केलं आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket

Title
Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket
Copyright
Release Date

flashback