Divya Divya Deepotkar | दिव्या दिव्या दीपोत्कार

Release Date:

The Deep (lamp)...It's a symbolic version of our energy source Suryadev(Sun). It's a true symbol of light, pure knowledge, energy, and liveliness. 
Our daily pooja or any of our auspicious occasions can't start without the ritual of lighting a lamp. It's the gratitude we offer to Agnidev.
Deep comes in various forms like Diwa, Panati, samayee, niranjan and many more. It has very special importance in our Hindu culture.  
Today is आषाढ अमावस्या-- 'दिव्यांची आवस' which is specially celebrated for honoring this symbol of energy... Deep. This day is also known as गतहारी अमावस्या. 
Do listen to our podcast " Divya Divya Deepotkar " to know more about this Deeppujan and Gatahari Amavasya. Also understand the science and the importance of many leafy vegetables,(रानभाज्या) which are specially grown and consumed in the rainy season.
So listeners...stay tuned with podcast 'utsavsananchamelsanskrutiparamparancha' with srujanskhya and Ep.Log Media.
Presented by -Sau.Aparna ModakSau. Saroj Karmarkar Vaidya Sau.Swati Karve
हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे .रोजच्या पूजेत किंवा कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी, प्रथम दिव्याची पूजा करून सुरुवात केली जाते . या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन, ज्ञानाचा मंगलप्रकाश पसरू दे अशी दिव्याला प्रार्थना करतात. तसेच हा दिवस गताहारी अमावास्या म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल विशेष माहिती अवश्य ऐका.तसेच ह्यादिवसात उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि माहिती याबद्दलही काही खास जाणून घ्या.   
या मालिकेद्वारे आपल्या हिंदू सण समारंभाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवतो. अभिवाचन ,गोष्टी ,विवेचन, लोकगीत गायन, गजर, भजन-कीर्तन या सर्व कला प्रकारांनी ही माहिती रंजक पद्धतीने तुमच्यासमोर सादर करणे हा आमचा मानस. आतापर्यंत चैत्र आणि वैशाख महीन्यात आपले पाच podcast रिलीज झाले. या महिन्याचा पाॅडकास्ट आम्ही आज म्हणजेच 28 जुलै रोजी आषाढ अमावास्या म्हणजेच दिव्याच्या अमावस्येच्या निमित्ताने तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. 
आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..अंतर्गत,दिव्या दिव्या दीपोत्कारहा भाग नक्की ऐका, like करा, शेअर करा..
😊 धन्यवाद...🙏
संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे...
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.

Divya Divya Deepotkar | दिव्या दिव्या दीपोत्कार

Title
Divya Divya Deepotkar | दिव्या दिव्या दीपोत्कार
Copyright
Release Date

flashback